Israel Lebanon War Saam Tv
Video

Israel Lebanon War: पश्चिम आशियात युद्धाचा भडका, इस्त्राईल-लेबनॉन संघर्ष कधी थांबणार?

Special Report : पश्चिम आशियात इस्त्राईल आणि लेबनॉनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचे चटके संपूर्ण जगाला बसत आहेत. मात्र हे युद्ध थांबवण्यासाठी मोठा भाऊ म्हणून सुरक्षा परिषदेतील अमेरिका, रशिया, चीन यांसारखे देश ठोस भूमिका का घेत नाहीत? त्याची काय कारणं आहेत?

Satish Kengar

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडालाय. इस्त्राईल आणि लेबनॉन एकमेकांवर रॉकेट आणि क्षेपणास्त्राचा मारा करत आहेत.या युद्धाच्या आगीत फक्त दहशतवादीच नाही तर सर्वसामान्य नागरिकही होरपळत आहेत.

रशिया युक्रेन युद्धावेळी युरोपिय महासंघ आणि अमेरिका युक्रेनच्या बाजूने उभे होते. मात्र पश्चिम आशिया पेटलेला असताना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतील देश बोटचेपी भूमिका घेत आहेत. त्याची नेमकी कारणं काय आहेत? जाणून घेऊ...

'संयुक्त' अपयश

  • अमेरिकेतील निवडणुकीमुळे हॅरीस आणि ट्रम्प यांची बोटचेपी भूमिका.

  • पॅलेस्टाईनचं समर्थन करणारा रशिया युद्धात गुंतलेला असल्याने युद्ध रोखण्यात अडचणी.

  • वर्चस्वासाठी असलेली इराण आणि सौदी अरेबियातील स्पर्धा.

  • चीन आर्थिक-राजकीय हितसंबंध जपण्यात मग्न.

इस्त्राईल आणि लेबनॉन असो वा रशिया युक्रेन युद्ध... या युद्धाचे चटके संपूर्ण जगाला बसतात. त्यातच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतील देश ठोस भूमिका नाहीत. तर भारत भूमिका घेत असूनही सुरक्षा समितीचं सदस्यत्व नसल्याने असहाय आहे. त्यामुळे बड्या देशांनी दहशतवादाचा जीव नेमका कुठे आहे? हे शोधून त्यावर घाव घालण्याची गरज आहे. तसंच पश्चिम आशियातील युद्ध थांबवण्यासाठी आधी शस्त्रसंधी आणि त्यानंतर पॅलेस्टाईन आणि इस्त्राईल या द्विराष्ट्र प्रस्तावावर समझोता करायला हवा. तरच पश्चिम आशियात स्थैर्य निर्माण होऊ शकतं. नाहीतर युद्धाची व्याप्ती वाढत जाणं हे सगळ्यांचंच सामुहिक अपयश ठरेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

SCROLL FOR NEXT