Omar Abdullah X
Video

What the... युद्धबंदीचं काय झालं? Omar Abdullah यांचा ट्वीट करत सवाल | Video

Omar Abdullah : युद्धविरामावर सहमती दर्शवल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा भ्याडपणे हल्ला केला आहे. जम्मूमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Yash Shirke

पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांनी युद्धविरामावर एकमताने सहमती दर्शवली होती. दोन्ही बाजूंनी वाढत चाललेल्या तणावाला पूर्णविराम मिळाला, अशी माहिती समोर आली होती. मात्र, पाकिस्तानने पुन्हा एकदा विश्वासघात करत युद्धविरामाचे उल्लंघन केले आहे. अवघ्या तीन तासांतच पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेवर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी ट्वीट केले. 'श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले, युद्धबंदीचं काय झालं?' असे म्हणत त्यांनी शस्त्रसंधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पाकिस्तानकडून गोळीबार जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये झाल्याचे म्हटले जात आहे. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (BSF) पाकिस्तानच्या या कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले आहे. या घटनेमुळे सीमावर्ती भागात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. तसेच श्रीनगरमध्येही सात ते आठ स्फोटांचे आवाज ऐकू आले अशी माहिती मिळलीआहे. या स्फोटांचा तपास सुरू आहे. गोळीबाराच्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. संध्याकाळी ५.३० वाजता युद्धविरामाची अंमलबजावणी सुरू झाली होती. परंतु, रात्री ८ वाजताच पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडून काढली. त्यामुळे पाकिस्तानच्या या भ्याड कृतीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanya Sumangala Yojana: लाडक्या लेकींना जन्मापासून मिळणार २५,००० रुपये, काय आहे सरकारची खास योजना?

Maharashtra News Live Update: खोपोलीच्या डम्पिंग ग्राऊंडला महिन्याभरात तिसऱ्यांदा आग

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील दर किती?

Beed Crime: बीड हादरले! परळीत राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, ५ ते ६ जणांनी भररस्त्यात कोयत्याने केले सपासप वार

Deepika Padukone Latest News: सिनेसृष्टीपासून दूर राहून अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या नेमकी काय करतेय?

SCROLL FOR NEXT