police gambling in Police station | पोलीस ठाण्यात पोलिसांनीच मांडला जुगाराचा डाव SAAM TV
Video

VIRAL VIDEO : सिगारेटचे झुरके, पत्त्यांचा डाव; पोलीस ठाण्यातील हा धक्कादायक प्रकार एकदा बघाच!

Nagpur Police Video viral : नागपूरमध्ये एका पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारीच जुगार खेळत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Saam Tv

नागपूर पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. चौकीतच काही पोलीस कर्मचारी जुगार खेळताना आणि धुम्रपान करताना दिसत आहेत. कळमना पोलीस ठाण्यातील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळतेय. नागपुरात गंभीर गुन्हे घडत असताना नागरिकांना पोलिसांकडून मोठी अपेक्षा असते. मात्र पोलिसच ठाण्यात जुगार खेळायला बसल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचं काय होणार? असा प्रश्न आता नागपूरकर विचारत आहेत.

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्यातला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातं. पोलीस चौकीतच पोलीस अधिकारी जुगार खेळताना दिसत आहे. इतकंच नाही तर सिगारेटचे झुरके मारतानाही ते दिसतात. हा व्हिडिओ तक्रारदारानं काढल्याचं अँगलवरून दिसतंय. या प्रकारामुळं सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात असून, आता या जुगारी पोलिसांवर काय कारवाई होते, हे बघावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking health risks: सिगारेट पिणाऱ्यांच्या आजूबाजूलाही फिरकू नका; वाढतो मृत्यूचा धोका

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

SCROLL FOR NEXT