bees attack on women's in poladpur nive village  SAAM TV
Video

VIDEO : अरेरे! वडाची पूजा करायला गेलेल्या महिलांवर मधमाशांनी चढवला हल्ला, बघा नेमकं काय घडलं?

bees attack video : वडाची पूजा करायला काही महिला गेल्या होत्या. या महिलांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. रायगडच्या पोलादपूर तालुक्यात ही घटना घडली.

Nandkumar Joshi

सचिन कदम, साम टीव्ही, रायगड

अवघ्या महाराष्ट्रात वटपौर्णिमेनिमित्त महिला वर्गात उत्साह असताना, रायगडमधील पोलादपूर तालुक्यातल्या निवे गावात दुर्दैवी घटना घडली आहे. वटपौर्णिमेला वडाची पूजा करायला गेलेल्या महिलांवर मधमाशांनी हल्ला चढवला.

गावातील बऱ्याच महिला या वटपौर्णिमेला वडाची पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. काही महिला वडाच्या झाडाची पूजा करत होत्या. अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात जवळपास १४ महिला जखमी झाल्या आहेत. या महिलांना तात्काळ नजीकच्या पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील निवे गावातील विवाहित महिला वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. महिलांकडून वडाच्या झाडाची पूजा सुरु असताना त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. या मधमाशांच्या हल्ल्यानंतर १४ महिला जखमी झाल्या आहेत. या महिलांवर पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT