Washim Accident Saam Tv
Video

Washim Accident : ट्रॅव्हल्स अर्धा किलोमीटर उलटी धावली; प्रवाशांनी मारल्या धावत्या बसमधून उड्या, थरारक VIDEO

Washim Travel running reversed : वाशिममध्ये ट्रॅव्हल्सचा विचित्र अपघात झालाय. बस चक्क उलटी धावल्याचं व्हिडिओमध्ये कैद झालंय.

Rohini Gudaghe

मुंबई : वाशिममध्ये भरधाव वेगाने जाणारी एक ट्रॅव्हल सुसाट वेगात मागे धावू लागली आणि मागून येणाऱ्या खासगी बसला धडकली. यामुळे प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी बसमधून उड्या मारल्याचं समोर आलीय. या घटनेमध्ये एकजण किरकोळ जखमी झालाय. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. हा सर्व प्रकार रात्री साडेअकरा वाजता घडला असल्यची माहिती मिळतेय. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. ट्रॅव्हल्स चालकावर मद्यपान केल्याचा आरोप केला जातोय.

वाशिमच्या मालेगाव येथे पुण्याच्या दिशेने जाणारी ट्रॅव्हल्स अचानक रिव्हर्समध्ये धावू लागली होती. त्यामुळे काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बसमधून उड्या मारल्या. सुमारे पाचशे मीटर बस उलटी धावत होती. सुदैवाने ही ट्रॅव्हल्स रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर धडकली अन् ट्रॅव्हल्सचा वेग कमी झाला, पण काही वेळातच ही रिव्हर्स ट्रॅव्हल्स मागून येणाऱ्या दुसऱ्या पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला धडकली. यामध्ये दुसऱ्या ट्रॅव्हल्सचा समोरील काच तुटली. केबिनमध्ये बसलेल्या एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

Kalyan Toilet Protest : १२ हजार जणांच्या लोकवस्तीत एकच शौचालय, नागरिकांचं थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर 'टॉयलेट' आंदोलन

Gk: हाताच्या तळव्यावर केस का नसतात? कारण वाचून चकित व्हाल

Online Shopping Scam : ऑनलाइन खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमच्यासोबत होईल हा स्कॅम

Madha Flood : माढ्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा उध्वस्त; सीना नदीच्या महापुरात नुकसान

SCROLL FOR NEXT