Congress candidate Raju Wankhade surprises election officers by paying ₹5,000 nomination deposit entirely in coins at Washim Municipal office. Saam Tv
Video

काँग्रेस उमेदवाराची कमाल, डिपॉझिट म्हणून चिल्लर भरली; निवडणूक अधिकारीही चक्रावले|VIDEO

Washim Congress Candidate 5000 Rupees: वाशिम नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार राजू वानखडे यांनी उमेदवारी अर्जासोबत ५ हजार रुपयांची अनामत रक्कम चिल्लर नाण्यांमध्ये भरली.

Omkar Sonawane

नगर परिषदेच्या निवडणुकीचा आज उमेदवारी भरण्याचा चौथा दिवस आहे. उमेदवारी अर्जा सोबत अनामत रक्कम भरावी लागते आणि ही रक्कम उमेदवाराने चक्क चिल्लरच्या स्वरूपात आणल्याने अधिकारीही चक्रावले. वाशिम नगरपालिकेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसचे उमेदवार राजू वानखडे यांनी चक्क 5000 रुपयांची एक, दोन आणि पाच रुपयांची नाणी आणून अधिकाऱ्यांना दिली. असा कोणताच नियम नाही की चिल्लर पैसे घेता येत नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांना ती रक्कम स्वीकारावी लागली. यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांची चिल्लर नाणी मोजताना चांगलीच फजिती झाली. दरम्यान, मुलीने जमा केलेली ही नाणी अनामत रक्कम भरण्याचा आग्रह होता म्हणून ही रक्कम भरत असल्याचं वानखडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT