Waris Pathan News : MIMचे उमेदवार वारिस पठाण यांना अश्रू अनवार, नेमकं कारण काय? | Marathi News  
Video

Maharashtra politics : प्रचारापासून मला रोखण्याचा प्रयत्न, वारीस पठाण ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ

Waris Pathan News : MIMचे उमेदवार वारिस पठाण यांना अश्रू अनवार, नेमकं कारण काय? | Marathi News

Namdeo Kumbhar

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक असताना रविवारी रात्री आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील एम आय एम पक्षाचे उमेदवार वारिस पठाण यांनी गंभीर आरोप केला. सर्व विरोधक मला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करीत भावूक होत ते रडले. मी येथे सर्वसामान्य जनतेचे काम करण्यासाठी आलो आहे. परंतु जाणीवपूर्वक माझ्या प्रचार रॅलीला परवानगी नाकारली जाते. माझ्या प्रचारात वाहन घुसवली जातात. मी या भिवंडी शहराला बदलण्यासाठी आलो आहे. येथे चांगल्या आरोग्य सुविधा,शहर स्वच्छता, चांगले शिक्षण मिळावे यासाठी मी येथे आलो आहे. चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो हाच माझा दोष आहे.

मला रोखण्याचा प्रयत्न भाजपासोबतच सर्व विरोधक करत आहेत. भाजपाला मीच हरवू शकतो हे माहीत असल्याने सर्व विरोधी उमेदवार एक झाले आहेत.पण येथील निवडणूक जनतेने हाती घेतली असल्याने मी जिंकणार आहे मला सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा आहे असा विश्वास वारीस पठाण यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT