beed temple saam tv
Video

Waqf Board: बीडच्या कंकालेश्वर मंदिराच्या जागेवर वक्फ बोर्डाचे अतिक्रमण, पुजाऱ्यांना मारहाणीची धमकी,VIDEO

Kankaleshwar Temple: संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील दोन मंदिरांचा उल्लेख केला.

Omkar Sonawane

कोल्हापूरच्या वडणगे गावातील महादेव मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. तसेच, बीडमधील कंकालेश्वर मंदिराची 12 एकर जमीन वक्फ बोर्डाने जबरदस्तीने ताब्यात घेतली होती. अमित शाहांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी साम टीव्हीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष स्थळाला भेट दिली. गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत बीडच्या कंकालेश्वर मंदिराच्या जमिनीचा उल्लेख केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या अनेक मालमत्ता आहेत, परंतु त्या कायदेशीर मालकीच्या आहेत की अतिक्रमित, याबाबत स्पष्टता नाही.

कंकालेश्वर मंदिराच्या मागील भागातील सर्वे नंबर 91, 92 आणि 1 वक्फ बोर्डाच्या मालकीचे असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ही 12 एकर जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे का, आणि भविष्यात ती कंकालेश्वर मंदिराला परत मिळेल का, याबाबत निश्चितता नाही. आता हा विषय केवळ चर्चेत राहणार की यावर ठोस निर्णय घेतला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati News: अमरावती रुग्णालयातील स्फोटाचा VIDEO समोर, ३ नवजात बाळांचा झाला होता मृत्यू

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

राज्यसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये मोठा भूकंप होणार? अनेक नेते बदलणार पक्ष;बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

तुम्हीही दिवसभर एकाच जागी बसून काम करता? आरोग्यावर होऊ शकतात 5 गंभीर परिणाम; वेळीच घ्या काळजी

Thursday Horoscope: या 3 राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास; पैशांपासून कामाच्या संधीपर्यंत मिळणार मोठी खुशखबर!

SCROLL FOR NEXT