Walmik Karad will surrender 
Video

Walmik Karad will surrender : वाल्मीक कराड सरेंडर करणार, देशमुख प्रकरणात नवा ट्विस्ट?

Valmik Karad CID case : वाल्मीक कराड सरेंडर करण्याची शक्यता आहे. कारण, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने कराडसह चार जणांची बँक खाती गोठवली आहेत.

Namdeo Kumbhar

Sarpanch Santosh Deshmukh Valmik Karad : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबरला अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. तीन आठवड्यानंतरही या प्रकरणातील मास्टरमाईंड समजला जाणारा माल्मिक कराडला अटक न केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी सीआडीला कठोर करवाईचे आदेश दिले आहेत. आरोपींची बँक खात गोठवण्याचे आदेशही देण्यात आले. आता मिळालेल्या माहितीनुसार, माल्मिक कराड सरेंडर करणार असल्याचं समोर आलेय.

वाल्मीक कराड सरेंडर करण्याची शक्यता आहे. कारण, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने कराडसह चार जणांची बँक खाती गोठवली आहेत. खंडणी आणि अपहरण प्रकरणात कराड याचं नाव समोर आले होते. याप्रकरणात आरोपींच्या ठसाच्या निशाण जुळल्याचे समोर आले. सीआयडीकडून वेगाने तपास सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश दिल्यानंतर बँक खाती गोठवण्यात आली. कराडला अटक करण्यासाठी सीआयडीच्या नऊ पथकाकडून तपास करण्यात येत आहे. कराड आत्मसमर्थन करणार असल्याचे समोर आलेय.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण, निर्घृण हत्या तसेच पवनचक्की प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी, अॅट्रॉसिटी व पवनचक्की प्रकरणी मारहाण या चारही गुन्ह्यांतील आरोपींच्या चोहोबाजूंनी मुसक्या आवळायला पोलिसांनी सुरवात केली आहे. या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) या चार गुन्ह्यांतील सर्व नऊ आरोपींची बॅंक खाती गोठवली आहेत. आरोपी वाल्मीक कराडच्या एका निकटवर्तीय नातेवाईकाला रविवारी (ता. २९) पोलिसांनी ताब्यात घेतले. उशिरापर्यंत ही व्यक्ती ताब्यात होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

jio 365 days Plan: वर्षभर रिचार्जची गरज नाही! Jioचा 365 दिवसांचा धमाकेदार प्लॅन; 2.5GB डेटा, किमंत फक्त...

Maharashtra Live News Update : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया

Pune : पुण्यातील सरकारी हॉस्टेलमध्ये दूषित पाणी, २० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

Diabetes Symptoms: पायांमध्ये होणारे हे बदल देतात मधुमेहाचे संकेत; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

SCROLL FOR NEXT