Walmik Karad Enquiry SaamTv
Video

Walmik Karad CID Enquiry : वाल्मिक कराडची सीआयडी चौकशी, विचारले 'हे' प्रश्न | VIDEO

Walmik Karad Surrender : केजच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सीआयडीला शरण आलेल्या वाल्मिक कराड याची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. या चौकशी दरम्यान पोलिसांनी त्याला काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

Saam Tv

बीड जिल्ह्यातील केजच्या मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य सूत्रधार समजल्या जाणाऱ्या वाल्मिक कराड याने आज पुणे पोलिसांना आणि सीआयडीला आत्मसमर्पण केलं आहे. आज सकाळी स्वत:चा एक व्हिडिओ बनवून कराडने सोशल मिडियावर पोस्ट केला. त्यानंतर तो पुण्याच्या पाषाण परिसरातील सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. त्यानंतर साधारण दुपारी 12.30 वाजल्यापासून त्याची चौकशी सुरू होती.

राज्यात वेगवेगळ्या भागात सीआयडीने कराडच्या शोधासाठी पथक रवाना केले होते. तरी त्याचा शोध लागला नव्हता. त्यानंतर आज तो पोलिसांना शरण आल्यावर वाल्मिक कराड याला चौकशी दरम्यान पोलिसांनी चार महत्वाचे प्रश्न विचारले. यात गेल्या 22 दिवसांपासून कराड कुठे होता? सरपंच देशमुख प्रकरणात त्याचा काय संबंध आहे, असे सवाल करण्यात आले. वाल्मिक कराड याला पोलिसांनी चार प्रश्न केले. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून 22 दिवस कराड कुठे होता? माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात काय संबंध आहे? खंडणीचं प्रकरण नेमकं काय आहे? आणि यादरम्यान कुणाशी संपर्कात होता? असे प्रश्न पोलिसांनी चौकशी दरम्यान वाल्मिक कराडला विचारले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

अचानक धनलाभ होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन होणार सुरू

कोकणात ठाकरेसेनेचा उमेदवार फोडला; महाराष्ट्राच्या राजकारणात माघारीचा पॅटर्न, कोणी कुठे घेतली माघार?

SCROLL FOR NEXT