Devendra Fadnavis SaamTv
Video

CM Devendra Fadnavis : वाल्मिक कराड सरेंडर प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठी प्रतिक्रिया, म्हणाले .. | VIDEO

Walmik Karad Surrender : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून संशयित असलेल्या वाल्मिक कराडने आज पुण्यात सरेंडर केलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

बीडच्या मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात संशयित असणारा वाल्मिक कराड आज अखेर सीआयडीपुढे शरण आला. पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले. त्याची सध्या चौकशी सुरू आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी फासावर लटकेपर्यंत पोलीस स्वस्थ बसणार नाहीत, असं त्यांनी म्हंटलं आहे. या प्रकरणात ज्याचा संबंध ज्या प्रकरणात आढळेल त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. गुंडांचे राज्य चालवून घेतले जाणार नाही. कुणालाही अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही व खंडणी मागता येणार नाही, अशी ग्वाही देखील यावेळी फडणवीस यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड हा विश्वासू आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं आहे. आज वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आता त्याच्या चौकशीतून काय समोर येईल याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी या प्रकरणी भाष्य करताना पुढे म्हंटलं की, आम्ही कुणालाही सोडणार नाही. तपास अतिशय गतीशिल करण्यात आला आहे. त्यामुळेच त्यांना शरणागती पत्करावी लागली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथकं सक्रीय झाली आहे. सर्वांचा शोध घेतला जाईल. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माझी फोनवरून चर्चा झाली आहे. त्यात मी त्यांना काळजी न करण्याची ग्वाही दिली. सर्व दोषी शोधून ते फासावर लटकेपर्यंत पोलीस स्वस्थ बसणार नाहीत, असंही मी त्यांना सांगितलं आहे, असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अमित शाह कधीही पंतप्रधान होणार नाही: Sanjay Raut यांचा मोठा दावा

Singer Death : संगीत विश्वाचा जादुई आवाज हरपला; प्रसिद्ध गायिकेचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Fatty Liver : फॅटी लिव्हरसाठी वरदान ठरतील 'ही' ३ फळे, कधी अन् कशी खायची?

Mumbai : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने टोकाचे पाऊल उचललं, खळबळजनक कारण आले समोर

Raksha Bandhan 2026: भावाला राखी बांधताना ३ की ५, किती गाठी बांधाव्यात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT