Parli Bandh : वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून परळी बंदची हाक Saam Tv
Video

Parli Bandh : वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून परळी बंदची हाक, पाहा व्हिडीओ

Walmik Karad Supporters Called Parli Bandh : वाल्मीक कराड समर्थकांनी आज परळी बंदची हाक दिली आहे. वाम्लिक कराड याला मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक झाले आहेत.

Namdeo Kumbhar

Today Parli Bandh Called By Walmik Karad Supporters : वाल्मीक कराड समर्थकांनी आज परळी बंदची हाक दिली आहे. वाम्लिक कराड याला मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक झाले आहेत. मंगळवारी परळीमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव होता. समर्थकांनी आक्रमक आंदोलन केले, काही जण टॉवरवर चढले तर कुणी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. वाल्मिक कराड यांच्या आई आणि पत्नीही या आंदोलनात उतरल्या होत्या. आज परळी बंदची हाक देण्यात आली आहे.

आज परळी बंदची हाक वाल्मीक कराड याच्या समर्थकांनी दिली आहे. सकाळपासूनच परळीमधील बाजारपेठा कडकडीत बंद आहेत. दुकानाला टाळे लावण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता वाल्मीक कराड याच्या समर्थकांची बैठक होणार आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.

वाल्मीक कराडला घेऊन बीड पोलीस केजच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज कराडला केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वाल्मिक कराडचा Sit ताबा मागणार आहे, कोर्ट काय निकाल देतेय, त्याकडे लक्ष लागलेय. वाल्मिक कराड याला कोर्टाने काल १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराड याला मकोका लावण्यात आला, त्यानंतर परळीमध्ये वातावरण तापले. अनेकांनी आपला निषेध व्यक्त केला. पोलीस स्टेशनबाहेरच आंदोलन करण्यात आले. बीडमध्ये जमावबंदी असताना परळीत मात्र हिंसक आंदोलन झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Cholesterol: या 6 सोप्या टीप्स शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतील नियंत्रणात; हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी

ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टरचे महाराष्ट्र कनेक्शन, राज्यात ATSची एकाचवेळी १५० ठिकाणी छापेमारी, ६ जण ताब्यात

Maharashtra News Live Update: जालन्यात कृषीविभागाने फुकट वाटलेलं महाबीजचे सोयाबीन बियाणे उगवलच नाही

गावरान स्टाईलची चिचुर्ड्याची भाजी तुम्ही कधी खाल्लीये का? एकदम सोपी आहे रेसिपी

Face Care: चेहऱ्यावरील सूज आणि ओपन पोर्स कमी करायचे आहेत? मग करा ही १ मिनिटाचा सोपा घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT