Walmik Karad  saam tv
Video

Walmik Karad : मला निर्दोष मुक्त करा, वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज, VIDEO

Walmik Karad in Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यानं या खटल्यातून निर्दोष मुक्तता करावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे. मात्र, त्याच्या विनंती अर्जाला सरकारी वकिलांनी विरोध केला आहे.

Nandkumar Joshi

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीड विशेष न्यायालयासमोर झाली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आरोपांतून निर्दोष मुक्त करण्यात यावे, असा अर्ज वाल्मिक कराडने वकील विकास खाडे यांच्यामार्फत न्यायालयात केला. मात्र, या मागणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विरोध केला आहे.

वाल्मिक कराडसंदर्भात वकील विकास खाडे यांनी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे. यावर सीआयडीकडून २४ तारखेला उत्तर देण्यात येईल, अशी माहिती निकम यांनी दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी मारहाणीचे व्हिडिओ चित्रित केले होते, त्याचा पेन ड्राइव्ह कुठल्याही परिस्थितीत बाहेर जाता कामा नये किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध होऊ नयेत याची खबरदारी घ्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली, अशी माहितीही त्यांनी दिली. महत्वाचे म्हणजे वाल्मिक कराडच्या अर्जाला निकम यांनी विरोध केला. मला या खटल्यातून निर्दोष मुक्त करावे, अशी मागणी वाल्मिक कराडने न्यायालयात केली आहे. त्यावर येत्या २४ तारखेला सीआयडी आपले म्हणणे मांडणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. वाल्मिक कराडची चल-अचल संपत्ती जप्त करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाकिस्तानी गँगस्टर शहबाज भट्टीसोबत लिंक असल्याच्या माहितीवरून दहा तरुणांना नागपूर ATS ने घेतलं ताब्यात

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

स्मार्ट मीटर बसण्यापूर्वीच ४४० व्होल्टचा झटका; पाठवलं ५ महिन्यांचं वीजबिल, धक्कादायक प्रकरणाने राज्यात खळबळ

Shocking: नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची आत्महत्या, चिंचेच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Eknath Shinde : शिवसेनेला खिंडार! एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, नाराज नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

SCROLL FOR NEXT