Vishal Patil become MP Sangli Lok Sabha Election 2024 Saam TV
Video

Vishal Patil News | तिकीट आणि पक्ष नाकारलेल्या विशाल पाटलांना सांगलीकरांनी स्वीकारलं!

Vishal Patil News Today | तिकीट नाकारलं... पक्षाने नाकारलं... कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.. अनेकांनी साथ सोडली.. पक्षातले जवळचे सहकारी परके झाले.. वरिष्ठांनी दुर्लक्ष केलं.. पण, तरीही विशाल पाटलांना सांगलीकरांनी स्वीकारलं.. आपलं सर्वस्व पणाला लावून विशाल पाटलांनी सांगली लोकसभेचं मैदान मारलं..

Saam TV News

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले.. या निकालांमध्ये अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष सांगली लोकसभेच्या निकालाने वेधलं... कारण एकीकडे सलग दोनवेळा लोकसभा निवडणूक जिंकण्याचा दांडगा अनुभव असणारे भाजपचे संजय पाटील, तर दुसरीकडे राज्यात सहानुभूतीची लाट असणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे उमेदवार आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील या दोघांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती.. तसा सांगली हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला! पण, जागावाटपात कॉंग्रेसचा हाच बालेकिल्ला ठाकरे गटाच्या वाट्याला गेला. ठाकरे गटाची कोल्हापूरची हक्काची जागा शाहू महाराजांमुळे कॉंग्रेसच्या वाट्याला गेली. म्हणून ठाकरे गटाने थेट सांगलीवर क्लेम ठोकला.. बसं इथूनच निवडणुकीचं वारं फिरलं.. विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी याचा विरोध केला.. सांगलीची जागा कॉंग्रेसला मिळावी म्हणून, त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेटही घेतली.. सगळे प्रयत्न करुन झाले.. पण, ठाकरेंनी सांगलीच्या जागेवरुन दावा सोडला नाही.. एकिकडे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि डबल खासदार संजय पाटील निवडणुकीची कसून तयारी करत होते.. तर, दुसरीकडे विशाल पाटील तिकीटासाठी संघर्ष करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहल्यानगरमध्ये खळबळ! भाजप खासदाराच्या निकटवर्तीयावर बंदूक रोखली, नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी

Maharashtra Live News Update : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्षांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा

Mumbai : मुंबईत महिलेची दादागिरी, भररस्त्यात महिला पोलिसाला धमकी आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल

Viral Video: ९ महिन्यांपासून अडकलेली जीप बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांचा भन्नाट जुगाड; लोखंडी पाइपांचा पूल केला अन्.., पाहा व्हायरल व्हिडिओ

LPG Price Hike: पुन्हा दरवाढीचा ब्लास्ट होणार? आज अचानक ६० रूपयांनी सिलिंडर महागला, वाचा तुमच्या शहरातील दर

SCROLL FOR NEXT