viral-videos mumbai-local- 
Video

Mumbai Local Video : दे दणा दण! मुंबई लोकलमध्ये सीटवरून राडा, महिला प्रवाशाला मारहाण

Mumbai local train fight : मुंबई लोकलमध्ये जागेवरून वाद झाला आणि महिला प्रवाशाला मारहाण करण्यात आली. हा प्रकार व्हिडीओद्वारे व्हायरल झाला असून, रेल्वे सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलिस तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

CSMT-अंबरनाथ लोकल ट्रेनच्या डब्यात जागेच्या वादातून एका महिला प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली असून, प्रवासादरम्यान किरकोळ वाद वाढत जाऊन मारहाणीपर्यंत पोहोचला. प्रत्यक्षदर्शींनुसार, जागेवरून सुरू झालेल्या बाचाबाचीने आक्रमक स्वरूप घेतले, आणि काही महिलांनी एका प्रवाशाला मारहाण केली. यामुळे डब्यातील इतर प्रवासी घाबरले. या घटनेचा व्हिडीओ एका प्रवाशाने काढला असून, तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, व्हिडीओच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे लोकलमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT