A foreign national confronts two-wheeler riders violating rules on a walking street in Pune, in a moment that has now gone viral. Saam Tv
Video

पुण्यात बेशिस्त बाइकस्वारांना विदेशी पाहुण्यांनी शिकवला धडा, VIDEO व्हायरल

Foreigner Stops Bikers On Pune: पुण्यातील पिंपळे निलख परिसरातील वॉकिंग स्ट्रीटवरून जाणाऱ्या बेशिस्त दुचाकी चालकांना एका परदेशी नागरिकाने रोखत वाहतूक शिस्तीचा धडा शिकवला.

Omkar Sonawane

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरातील एका परदेशी नागरिकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. या व्हिडियोत बेशिस्त पुणेकरांना या परदेशी नागरिकाने चांगलाच धडा शिकवताना दिसत आहे. वॉकिंग स्ट्रीटवरून दुचाकी वाहनाने जाणाऱ्या बेशिस्त पुणेकरांना या परदेशी नागरिकाने रोखून धरलं आहे. मुळात परदेशी नागरिक वॉकिंग स्ट्रीटवर वॉक करत असताना अचानक झालेल्या वाहतूक कोंडीमुळे दुचाकी वाहन चालकांनी अक्षरशः त्यांची दुचाकी वाहन नेहमी प्रमाणे वॉकिंग स्ट्रीटवरून घालण्यास सुरुवात केली. हे दृष्य पाहून परदेशी नागरिकांचा संताप चांगलाच अनावर झाला आणि त्याने वॉकिंग स्ट्रीटवरून जाणाऱ्या बेशिस्त दुचाकी वाहन चालकांना रोखून धरलं आणि त्यांना मूळ रस्त्यावरून जाण्यास भाग पाडलं आहे. परदेशी नागरिकांची ही शिकवण खरंच पुणेकरांसाठी आणि आपल्या राज्यातील बेशिस्त नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT