Manse Saam TV
Video

Manse : मनसेचा परप्रांतीय दुकानदाराला चोप; मराठी अस्मितेबद्दल अपशब्द वापरणाऱ्याची काढली धिंड|VIDEO

Vikhroli : विक्रोळीतील परप्रांतिय दुकानदाराला मनसेनं चांगलीच अद्दल घडवली आहे. मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या दुकानदाराला मनसेनं चोप दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विक्रोळी परिसरात एका परप्रांतीय दुकानदाराने मराठी माणसांविषयी अपशब्द वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांत संतापाची लाट उसळली. या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि सबंधित दुकानदाराच्या वागणुकीविरोधात पुढाकार घेत जोरदार कारवाई केली.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित दुकानदाराला चोप देत त्याची चांगलीच अद्दल घडवली. एवढ्यावरच न थांबता त्या दुकानदाराची बाजारात धिंड काढण्यात आली. मनसेच्या या कडक कारवाईनंतर संबंधित दुकानदाराने आपली चूक मान्य करत जाहीर माफी मागितली.मनसेने स्पष्ट केलं की, मराठी माणसांचा अपमान सहन केला जाणार नाही आणि अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT