Vijay Vadettiwar SaamTV
Video

Vijay Vadettiwar : काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार, विजय वडेट्टीवार यांनी सांगितली तारीख

MVA Candidate List Update News : महाविकास आघाडीचे 216 जागांचे वाटप पूर्ण झाले असून उर्वरित जागांचे वाटप आज संपेल असं विजय वडेट्टीवार यांनी म्हंटलं आहे. यावेळी त्यांनी पहिली यादी कधी जाहीर होणार याबद्दल देखील सांगितलं आहे.

Saam Tv

काँग्रेसची पहिली यादी 20 तारखेला जाहीर होण्याची शक्यता आहे, असे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटलं आहे. महाविकास आघाडीचे 216 जागांचे वाटप पूर्ण झाले असून उर्वरित जागांचे वाटप आज संपेल असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, 216 पैकी 84 जागा या काँग्रेसच्या वाट्याला आल्या. 20 तारखेला संध्याकाळी पहिली यादी येण्याची अपेक्षा आहे आणि उर्वरित जागा आज वाटप झाल्यानंतर कदाचित 20 तारखेला अंतिम यादी देखील येऊ शकेल, असंही वडेट्टीवार यांनी म्हंटलं आहे. समजावादी पक्षासोबत चर्चा झाली आहे. त्यांनी काही जागा सांगितल्या आहेत. त्यांच्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आज आमचे जागा वाटप पूर्ण झाले की त्यांच्या त्यांच्या कोट्यातून जागा वाटपाची पूर्ण तयारी आहे. 216 जागावर चर्चा झाली आहे. 66 मतदारसंघावर आमची आज चर्चा सुरू आहे. छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष केले जात नाही. मुंबईतील जागा वाटपावर आमची चर्चा झाली आहे. त्यांत समाजवादी पक्षालादेखील आम्ही जागा सोडणार आहोत, असंही त्यांनी म्हंटलं आहे. तर समीर वानखेडेंवर बोलताना वडेट्टीवार यांनी ''जात असतील तर धनाड्य सोबत धनवान जात आहेत, या सर्वांचा हिशोब जनता करेल,'' असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT