Ladki Bahin Yojna News SaamTv
Video

VIDEO : 1500 रुपयांच्या नावाने महिलांना धमकावलं जातं; वडेट्टीवारांचा घणाघात

Vijay Vadettiwar : सत्ताधारी पक्षात लाडकी बहिण योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे, तर दुसरेकडे विजय वडेट्टीवार यांनी आता सरकारवर निशाणा साधला आहे.

Saam Tv

लाडकी बहिण योजनेवरून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमाला आता महिलांना धमकावून बसमध्ये बसवलं जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. 'बसमध्ये बसा, नाहीतर तुम्हाला 1500 रुपये मिळणार नाही,'' अशी धमकी महिलांना दिली जात असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हंटलं आहे.

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवरून वेगवेगळे वादंग सुरू असतानाच आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी या योजनेवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. ''तुम्हाला पैसे हवे असतील तर गाडीत बसा, असा फर्मान या सरकारने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवला आहे. गाडीत बसले नाही तर 1500 रुपये मिळणार नाहीत. असं सांगितल्याने लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होते.'' असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे एकीकडे सत्ताधारी पक्षात लाडकी बहिण योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू असतानाच विरोधी पक्षाकडून या योजनेवर ताशेरे ओढले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

SCROLL FOR NEXT