Video  Saam Digital
Video

Video : मी नाईलाजास्तव अजित पवारांसोबत गेलो, राष्ट्रवादीच्या आमदाराच मोठं विधान

Rajendra Shingne On Ajit Pawar : मी जरी अजित पवार यांच्यासोबत नाईलाजास्तव गेलो तरी, गेल्या दोन अडीच वर्षात शरद पवार यांच्यासोबत संबंध तोडलेले नाहीत. शरद पवारही आमचे नेते आहेत, असं आमदार राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.

Sandeep Gawade

मी नाईलाजास्तव अजित पवरांसोबत गेलो, असं मोठं विधान अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी केला आहे. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांच्या दबावाखाली आमदार फूटले असा घणाघात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मी जरी अजित पवार यांच्यासोबत गेलो तरी, गेल्या दोन अडीच वर्षात शरद पवार यांच्यासोबत संबंध तोडलेले नाहीत. शरद पवारच आमचे नेते आहेत. भविष्यातही पवार साहेबांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासकच राहणार आहे, असं राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.

त्यावर खासदार सुप्रीया सुळे यांनी, शिंगणे कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे गेल्या अनेक दशकांपासूनचे संबध आहेत. राजकारण होत राहत, मात्र शेवटी संबंध महत्त्वाचे असतात. त्यांच्या बँकेची अडचण होती, त्यामुळे ते अस्वस्थ होते. ते चांगले नेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी ते कुठेही जाणार नसल्यांचं म्हटलं आहे. तसंच सर्वांनी मिळून एनडीए, महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटपर्यंत एनडीसोबतच राहण्याची भूमिका असेल, असं ते म्हणाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT