Vasai Virar Rain Saam TV
Video

Vasai-Virar Rain News : वसई-विरारमध्ये जोरदार पाऊस, सखल भागात साचलं पाणी|VIDEO

Heavy Rain News : वसई-विरार शहरात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे शहराच्या सखल भागांतील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे याचा थेट फटका शहराच्या वाहतुकीवर बसला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वसई -विरार शहरामध्ये काल संध्याकाळपासूनचं पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे शहराच्या सखल भागामध्ये मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. इथला थेट फटका आता शहराच्या वाहतुकीवर बसल्याचा पाहायला मिळतोय. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहने बंद पडली असून वाहतुकीची गती मंदावली आहे.

विरार पश्चिमेकडील जैन मार्ग या ठिकाणचा मुख्य रस्ता आहे तो पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे कुठेतरी वाहतुकीचा मोठा परिणाम होताना पाहायला मिळत आहे .हा रस्ता मुख्य असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या वाहनाच्या रांगा असतात.नागरिकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे. कार्यालय, शाळा, रुग्णालय गाठण्यास वेळ लागतो आहे, तर काही ठिकाणी आपत्कालीन सेवा देण्यात अडचणी येत आहेत. येथे दरवर्षा पासुनचं पाण्याची समस्या उद्भवेलेली आहे. मात्र महानगरपालिका याच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या नागरिकांच्या आता आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता महानगरपालिका प्रशासनं पाणी कसं निचरा करत हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Police File Case Against Nilesh Ghaywal: इथे फक्त बॉस, बाकी सगळे....गुन्हेगारीच्या रील्स अपलोड केल्याप्रकरणी निलेश घायवळ वर गुन्हा|VIDEO

Dog Attack : शाळेत जाणाऱ्या चिमुकलीचे कुत्र्याने तोडले लचके; विद्यार्थिनी गंभीर जखमी

Maharashtra Live News Update: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आज एकत्र दिसणार

महिलेनं धावत्या लोकलवर फेकला दगड, VIDEO व्हायरल, मुंबई पोलिसांची एन्ट्री झाली अन् सत्य आलं समोर

Nora Fatehi Photos: 'आयटम गर्ल' नोराचा तोरा, फोटो पाहून म्हणाल, ही तर बार्बीडॉलच

SCROLL FOR NEXT