Vande Bhanrat Express Viral Video  Saam TV
Video

Vande Bhanrat Express Video: वंदे भारत एक्स्प्रेस बंद पडली, मालगाडीचं इंजिन लावून खेचलं; VIDEO तुफान व्हायरल

Vande Bhanrat Express Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका वंदे भारत एक्स्प्रेसचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मालगाडीचे इंजिन वंदे भारत ट्रेनला खेचत असल्याचं दिसून येतंय.

Satish Daud

सध्या सोशल मीडियावर एका वंदे भारत एक्स्प्रेसचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मालगाडीचे इंजिन वंदे भारत ट्रेनला खेचत असल्याचं दिसून येतंय. काँग्रेसने आपल्या अधिकृत अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओ पाहून नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

'वंदे भारत'ला मालगाडीने खेचलं

व्हायरल झालेला व्हिडीओ हा उत्तर प्रदेशातील असल्याचं कळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीहून वाराणसीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस उत्तर प्रदेशच्या इटावा स्थानकावर आली. तेव्हा एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे बऱ्याच वेळ ही ट्रेन एकाच जागी थांबून होती.

दरम्यान, एक्स्प्रेसमध्ये बिघाड झाल्याचं कळताच टेक्निकल टीम घटनास्थळी पोहोचली. शर्थीचे प्रयत्न करूनही वंदे भारत सुरु झाली नाही. तेव्हा ट्रेनला खेचण्यासाठी चक्क मालगाडीचे इंजिन मागवण्यात आले. या ट्रेनमधून जवळपास 730 प्रवासी प्रवास करीत होते. त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी हॉटेलस्टाईल कुरकुरीत जलेबी बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये निकालाचा एक दिवस अगोदर तळोदा शहरात जादूटोणा

महिलेला बोगस मतदान करताना पकडलं अन्...; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Election : महाविकास आघाडी फुटली; मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार

Kopargaon Nagarparishad: भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले, मतदान प्रक्रियेदरम्यान राडा | Video Viral

SCROLL FOR NEXT