black magic incident on valentine day in kolhapur kodoli saam tv
Video

Black Magic Video : फोटोवर खिळा ठोकलेला, काळी बाहुली, हळद-कुंकू; व्हॅलेंटाइन डेला तरुणीवर जादूटोणा?

Kolhapur Shocking Incident : व्हॅलेंटाइन डेला कोल्हापूरमधील कोडोली येथे जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आलाय. तरुणीच्या फोटोला खिळा ठोकून झाडावर काळी बाहुली आणि हळद-कुंकू लावलेला होता.

Nandkumar Joshi

व्हॅलेंटाइन डे खरं तर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी जोडीदार आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल प्रेमभावना व्यक्त करतो. याच प्रेम व्यक्त करण्याच्या दिवशी कोल्हापुरात विचित्र प्रकार घडला आहे. एका तरुणीवर जादूटोणा केल्याचं सांगितलं जात आहे. तरुणीचा फोटो एका झाडाला खिळ्याने ठोकलेला आहे. तर त्यावर हळद आणि कुंकू तसेच काळी बाहुली लावलेली दिसते. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे हा धक्कादायक प्रकार घडलाय. आनंदनगर परिसरात व्हॅलेंटाईन डेला एका झाडावर तरुणीचा फोटो आणि काळी बाहुली हळद-कुंकू लावून खिळ्याने ठोकण्यात आल्याचे दिसून आले. हा प्रकार भानामतीसारखा असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित प्रकारामागे नेमकं कोण आहे, याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी सुरू करावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

SCROLL FOR NEXT