Vaishnavi Hagawane News Update saam tv
Video

Vaishnavi Hagwane : वैष्णवी हगवणेच्या मारेकऱ्यांना अटक कधी होणार?

Vaishnavi Hagwane update News : वैष्णवी हगवणे हिनं आत्महत्या केली नसून, तिची हत्या झाल्याचा आरोप होत असून, या घटनेला आठवडा उलटला तरी मारेकरी मोकाटच आहेत. या आरोपींना अटक कधी होणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Nandkumar Joshi

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला आठवडा उलटला आहे. मात्र, संशयित मारेकरी अजूनही मोकाटच आहेत. पुणे पोलीस नक्की करतात तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. फक्त वैष्णवीचा पती शशांक, सासू लता हगवणे आणि नणंद हगवणेला अटक केली आहे. मात्र, सासरा राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर सुशील हगवणे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. त्यामुळे पुणे पोलीस या प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? असा सवाल विचारला जात आहे.

कारण, बीडच्या संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेही पाच महिन्यानंतरही मोकाटच आहे. पोलिसांच्या हाती तो लागत नाही. त्यामुळे यातून पोलिसांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. दुसरीकडे, वैष्णवीची आत्महत्या नव्हे तर खून असून महिला आयोगाच्या अध्यक्षांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, झोपेत असताना डोक्यात सिलिंडर टाकला

Cloudburst : गावे पाण्याखाली, हायवेवरील पूल वाहून गेला; अरुणाचल प्रदेशात ढगफुटीसदृश्य पावसाचा रुद्रावतार, VIDEO

Thane News : ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 48 तास बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Maharashtra News Live Update: सोयगावच्या जरंडी परिसरात दीड तास ढगफुटी सदृश्य पाऊस; नदी- नाल्यांना पूर

Lohagad Tourism : पावसाच्या सरींमध्ये खुलणारे लोहगडचे सौंदर्य, जवळच आहेत 'हे' ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

SCROLL FOR NEXT