pune news saam tv
Video

Vaishnavi Hagawane: निलेश चव्हाणच्या घरात पोलिसांचा तपास, ३ मोबाईल जप्त, अन्य दोन फोन कुणाचे? मोठी माहिती समोर|VIDEO

Major Break in Hagwane Suicide Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सहआरोपी असलेल्या निलेश चव्हाणच्या घरातून दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी या मोबाईल्सचा फॉरेन्सिक तपास सुरू केला असून, त्यातून महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी हगवणे कुटुंबियांसह निलेश चव्हाणला पोलिसांनी सहआरोपी केले आहे. तर पुणे पोलिसांच्या वारजे पोलिसांनी त्याला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच निलेश हा वैष्णवीच्या नणंदेचा म्हणजेच करिश्मा हगवणेचा मित्र आहे. गेल्या दहा दिवसांपासून हा पोलिसांना चकमा देत फिरत होता. नेपाळ बॉर्डरवरून त्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आज पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी निलेश चव्हाणला घेऊन थेट कर्वेनगरमधील त्याच्या राहत्या घरी धाड टाकली आहे. चव्हाणकडे असलेल्या दोन मोबाईल फोनची जप्ती करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

या मोबाईल फोनमध्ये वैष्णवी हगवणे हिची सासू लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांचे फोन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरू असून, पोलिसांकडून तांत्रिक पुरावे जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

Accident News : घंटागाडीची दुचाकीला धडक, गाडीचा जागीच चक्काचूर

SCROLL FOR NEXT