Vaishanvi Hagawane News Saam TV News
Video

Vaishanvi Hagawane News : हायवेवर फिल्मीस्टाईल ताबा, वैष्णवीचं बाळ देणारा अज्ञात कोण?

Vaishanvi Hagawane Case : वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर पोरकं झालेलं नऊ महिन्यांचं बाळ अखेर कुटुंबीयांकडे परत आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर बाणेर हायवेवर एका अज्ञात व्यक्तीने बाळ सुपूर्द केलं.

Namdeo Kumbhar

Vaishanvi Hagawane News Upate : वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे नऊ महिन्यांचे बाळ पोरके झाले होते. बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा दावा वैष्णवीच्या मामाने केला होता. निलेश हा वैष्णवीचा पती शशांक हगवणेचा बिझनेस पार्टनर असून, तो कर्वेनगरातील औदुंबर सोसायटीत राहतो. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळाला तातडीने कुटुंबाकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले. अखेर बाणेर हायवेवर एका अज्ञात व्यक्तीने बाळ वैष्णवीच्या कुटुंबीयांकडे सोपवले.

वैष्णवीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने फोन करून बाळ त्यांच्याकडे असल्याचे सांगितले आणि बाणेर हायवेवर बाळ देण्यासाठी बोलावले. तिथे बाळ सुखरूप प्राप्त झाले. “आम्हाला खूप आनंद झाला, बाळाला आयुष्यभर सांभाळू,” अशी भावना वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी व्यक्त केली. त्यांनी आरोपींना लवकर पकडण्याची मागणी केली. याप्रकरणी वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे (५१) यांनी १६ मे रोजी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शशांक, त्याची आई लता, नणंद करीश्मा यांना अटक झाली असून, सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: पीएफ खातेदारांसाठी मोठा दिलासा! 7 लाखांचे मोफत विमा संरक्षण कायम, नव्या नियमांमुळे मिळणार आणखी लाभ

मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार, खासदाराच्या दाव्याने खळबळ

Maharashtra News Live Update: 'भाजपमुक्त राम'च्या नाऱ्यावर शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला!

आता WhatsApp मुळे बर्थडे डेट सहज लक्षात राहणार; असे वापरा WhatsAppचे नवे फिचर

Blood Pressure Control: औषधांशिवाय वाढलेला बीपी नियंत्रणात आणायचाय? या 7 टीप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT