Vadhavan Port SAAM TV NEWS
Video

Video : पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन, बंदराला मच्छिमारांचा विरोध

Vadhavan Port News : वाढवण बंदराला स्थानिक मच्छिमारांकडून विरोध करण्यात येत आहे. बोटींना फुगे लावत भूमिपूजन कार्यक्रमाचा निषेध केला जातोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पालघर मध्ये वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. मात्र स्थानिक मच्छिमारांचा या बंदराला विरोध आहे. या बंदराचा प्रभाव त्यांच्या उपजीविकेवर होईल अशी मच्छिमारांची भीती आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमार त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. बोटींना काळे फुगे लावत तसेच हवेत काळे फुगे सोडत निषेध नोंदवण्यात आला आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून स्थानिक आणि मच्छीमारांकडून या बंदराला विरोध होत असतानाच विरोध डावलून केंद्र सरकारकडून हे बंदर उभारण्यात आल्याने स्थानिक आणि मच्छीमारांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्यातील आणि केंद्रातील अनेक मंत्री या सोहळ्याला उपस्थित राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT