Uttarakhand Video Saam Tv
Video

Uttarakhand News: खरा देवदूत! गंगानदीत वाहून जाणाऱ्या तरुणाचे SDRF जवानांनी वाचवले प्राण, रेस्क्यूचा थराराक VIDEO

Uttarakhand SDRF Jawan Video: एसडीआरएफच्या जवानाचा बचावकार्यादरम्यानचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. गंगा नदीमध्ये वाहून जाणाऱ्या एका भाविकाचे प्राणा जवानांनी वाचवले.

Priya More

उत्तराखंडच्या हरिद्वारमधून मोठी बातमी समोर आली आहे. एसडीआरएफच्या जवानाचा बचावकार्यादरम्यानचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. गंगा नदीमध्ये वाहून जाणाऱ्या एका भाविकाचे प्राणा जवानांनी वाचवले. या तरुणाला वाचवण्यासाठी जवानांनी स्वत:च्या जीवाची परवान न करता नदीमध्ये उडी मारली आणि त्याला बाहेर काढले. याठिकाणी असणाऱ्या काहींनी हा रेस्क्यूचा थरार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या दोन्ही जवानांचे कौतुक केले जात आहे. या तरुणासाठी हे एसडीआरएफचे जवान देवदूत बनून मदतीसाठी आले. २२ वर्षीय कमलेश हरिद्वारच्या कांगडा घाटावर गंगानदीतून वाहून जात होता. त्याला एसडीआरएफच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. कमलेश हरियाणाचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

SCROLL FOR NEXT