Donald Trump Saam Tv
Video

डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् भारताच्या शेअर मार्केटमध्ये तुफान, सेन्सेक्स-निफ्टीचा ऐतिहासिक उसळी

Sensex Today Big Jump : अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील टॅरिफ १८ टक्क्यांपर्यंत कमी केल्यानंतर भारतीय शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी पाहायला मिळाली. प्री-मार्केटमध्येच सेन्सेक्स ३ हजार अंकांनी वधारला तर निफ्टीने १४०० अंकांची झेप घेतली.

Namdeo Kumbhar

Impact of US tariff cut on Indian share market : भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. अनेक दिवसानंतर भारताच्या शेअर मार्केटने मोठी उसळी घेतली आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील टॅरिफ (आयात शुल्क) १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णायामुळे भारतीय शेअर बाजारात अक्षरशः 'तुफान' आले. प्री-मार्केट सत्रातच गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील यशस्वी चर्चेनंतर टॅरिफ कपात जाहीर करण्यात आली. याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला. प्री-मार्केट सत्रात सेन्सेक्स तब्बल ३,००० अंकांनी वधारला, तर निफ्टीने १४०० अंकांची ऐतिहासिक झेप घेतली. जागतिक पटलावर भारतासाठी हा मोठा व्यापारिक विजय मानला जात आहे. भारतीय कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही काळापासून अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर लादलेल्या कडक टॅरिफमुळे आयटी, फार्मा आणि कापड उद्योगावर दबाव होता. मात्र, आता हा टॅरिफ १८ टक्क्यांवर आल्याने भारतीय वस्तू अमेरिकन मार्केटमध्ये स्वस्त होतील, असे निलेश खरे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी कधी होणार मतदान, ५ जागांसाठी किती उमेदवार रिंगणात? जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी

Night Owl Risks : रात्री उशिरा झोपण्याची सवय ठरतेय आरोग्यासाठी घातक; शरीरावर होतात हे गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मेळावा महत्त्वाचा ठरणार

राजकारण तापलं! शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना भिडले; नेमकं काय घडलं?

Dussehra Horoscope : दसऱ्याला ७ राशींवर पैशांचा वर्षाव? सूर्य, गुरु, शुक्रासह अनेक ग्रहांची शुभ युती; कोणाला मिळणार लाभ?

SCROLL FOR NEXT