Union Budget News SaamTv
Video

Union Budget 2025 : पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक मांडण्यात येणार | Video

Union Finance Minister Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक मांडण्यात येणार असल्याचं आज सांगितलं आहे. संसदेत आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यावेळी त्यांनी याबद्दल सांगितलं.

Saam Tv

नवीन आयकर विधेयक पुढील आठवड्यात सादर केले जाणार आहे. मी तुम्हाला या प्रत्यक्ष कर सुधारणांबद्दल नंतर सांगेन, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हंटलं आहे. आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा सलग आठवा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी त्यांनी पुढच्या आठवड्यात नवीन आयकर विधेयक सादर करण्याबद्दल घोषणा केली आहे.

अर्थमंत्री म्हणाल्या की, आम्ही विमा क्षेत्रासाठी थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवणार आहे. केवायसी प्रक्रिया सोपी केली जाईल. यासाठीची नवीन प्रणाली या वर्षी सुरू होईल. कंपन्यांच्या विलीनीकरणाची व्यवस्था जलद केली जाणार आहे. सीतारामन म्हणाल्या की, गेल्या १० वर्षांत आम्ही व्यवसाय करण्याच्या सुलभतेत सुधारणा केली आहे. सुधारणेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल. यामुळे परवाने आणि मान्यता मिळविण्याच्या प्रणालीवर लक्ष ठेवले जाईल. तर विमा क्षेत्रासाठी एफडीआय ७४% वरून १००% पर्यंत वाढवला जाणार आहे. ज्या संपूर्ण प्रीमियम भारतात गुंतवतील अशा कंपन्यांसाठी ही सुविधा असणार आहे. ग्रामीण योजनांमध्ये पोस्ट पेमेंट बँक पेमेंट सेवा वाढवली जाईल.

दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की ३६ जीवनरक्षक औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द केला जाईल. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये कर्करोग डे केअर सेंटर बांधले जातील. कर्करोगाच्या उपचारांसाठी औषधे स्वस्त होतील. ६ जीवनरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी ५% पर्यंत कमी केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT