Pune SAAM TV
Video

Pune : मंचरमध्ये एकच खळबळ! मशिदीखाली सापडलं भुयार | पाहा VIDEO

Pune Manchar Mosque : रस्त्याच्या कामादरम्यान मशिदीखाली भुयार आढळून आल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मशिदीच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, पोलिस प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात मशिदीखाली भुयार सापडल्याने मोठी खळबळ उडाली. रस्त्याचे काम सुरू असताना मशिदीचा काही भाग कोसळला आणि त्यात भुयारासारखी रचना दिसून आली. ही माहिती पसरल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. हिंदू संघटनांनी या भुयाराचा सखोल तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी केली, तर मुस्लिम समाजाने झालेल्या नुकसानीवर आक्षेप नोंदवला आणि ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले. त्यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तातडीने बंदोबस्त लावत पाहणी केली असता, भुयारात कबर व्यतिरिक्त काहीही आढळले नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. मशिदीच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, पोलिस प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: घस्थापनेआधी तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग

माजी उपसरपंचानं गोळी घातली, तेव्हा पूजा कुठे होती? बँक डिटेल्स अन् कॉल लॉग जप्त, बंगल्याविषयी मोठी माहिती हाती

Highest Railway Station: जगातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन कोणतं? ज्या ठिकाणी श्वास घ्यालाही होतो त्रास

Shreya Bugde : उफ्फ तेरी अदा! श्रेयाचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Rashmika Mandanna Photos : ये लाल इश्क; अनारकली ड्रेसमध्ये रश्मिकाचं हिऱ्यासारखं लखलखतं सौंदर्य

SCROLL FOR NEXT