ulhasnagar news  Saam tv
Video

रुग्णाला ४ वेळा उपाशी ठेवून ऑपरेशन रद्द; उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचा भोंगळ कारभार

Ulhasnagar Hospital news : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. रुग्णाला ४ वेळा उपाशी ठेवून ऑपरेशन रद्द केल्याची बाब समोर आली आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातून संतापजनक प्रकार समोर आलाय. राजकुमार पासी नावाचा रुग्ण गेल्या तब्बल एक महिन्यापासून ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल आहे. परंतु त्याचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नाहीत. डॉक्टर सुट्टीवर आहेत, अशी कारणं देत ४ वेळा ऑपरेशन रद्द करण्यात आल्याचा आरोप रुग्णाने केलाय.त्यामुळे मध्यवर्ती रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

राजकुमार याला ४ वेळा शस्त्रक्रिया होणार असल्याचं सांगून दिवसभर उपाशी ठेवण्यात आलं. मात्र प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी ऑपरेशन रद्द करण्यात आलं. त्यानंतर पुढील तारीख देण्यात आली. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे राजकुमारची मानसिक आणि शारीरिक फरफट होतेय. धक्कादायक बाब म्हणजे, या रुग्णाला कुठलाही जवळचा वारस किंवा वाली नाही. त्यामुळे त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचं बोललं जातंय.

मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर अशा ग्रामीण भागातून अनेकदा गंभीर रुग्णही येत असतात. मात्र त्यांना थेट कळवा रुग्णालयात पाठवलं जातं. त्यामुळे उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण झालंय. या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे हे रुग्णालय खरंच उपचारासाठी आहे? की फक्त नावापुरतं सुरू आहे? असा संतप्त प्रश्न करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

80s Retro Trend: मराठी कलाकारांना 80s रेट्रो ट्रेंडची भुरळ; सोनाली ते रितेश-जेनेलियाचे पाहा भन्नाट लूक

२०२९ आधीच मोदी-शहा पायउतार होणार, राऊतांच्या वक्तव्याने दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप

Maharashtra News Live Update: सीजीपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके मनोज जारंगे पाटील यांच्या भेटीला

High Blood Pressure: रात्रीच्या वेळी अचानक BP वाढतोय? झोपण्यापूर्वी ही 3 ड्रिंक्स प्या

8th Pay Commission : जुन्या पेन्शनर्ससाठी मोठी अपडेट! PM मोदींकडे थेट मागणी; 8व्या वेतन आयोगात होऊ शकतो बदल

SCROLL FOR NEXT