Senior Advocate Ujjwal Nikam during a media interaction post Rajya Sabha nomination – Will he continue in the Santosh Deshmukh case? Saam Tv
Video

उज्ज्वल निकमांची राज्यसभेवर नियुक्ती, संतोष देशमुख हत्याप्रकरणाची केस आता कोण लढणार? VIDEO

Ujjwal Nikam special public prosecutor Santosh Deshmukh: ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते विशेष सरकारी वकील होते.

Omkar Sonawane

जेष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून उज्ज्वल निकमांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे. लोकसभा निवणुकीत निकमांचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून पराभव झाला होता. भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती.

कॉँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला होता. यानंतर त्यांनी पुन्हा आपले कामकाज सुरू केले होते. महाराष्ट्रामध्ये खळबळ माजवून देणाऱ्या बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर ते ती केस लढणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

याच संदर्भात साम टीव्हीशी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, राज्यसभेवर खासदार म्हणून खासदार म्हणून निवड झाल्यामुळे मी संतोष देशमुख प्रकरणावर विशेष सरकारी वकील म्हणून काम करू शकतो की नाही यावर अभ्यास करेन. मी कायदेतज्ञासोबत बोलणार आहे असे उज्ज्वल निकम म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संतापजनक! रूम रिकामी ठेवू पण मराठी लोकांना देणार नाही; मुंबईमध्ये शिंदे कुटुंबाला घर नाकारलं

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

Shocking: खाताना कुरकुरेचा तुकडा श्वसननलिकेत अडकला, तरुणाचा तडफडून मृत्यू

Rajasthan Sandstorm viral Video : भरदिवसा पडला रात्रीसारखा अंधार; थरकाप उडवणारं रेतीचं वादळ, VIDEO व्हायरल

Brain Stroke Symptom: हाता-पायाला सतत मुंग्या येतात? होऊ शकत ब्रेन स्ट्रोकचं कारण, जाणून घ्या लक्षणे

SCROLL FOR NEXT