Udhav Thackarey News SaamTv
Video

VIDEO : जो करेल मला मंत्री, त्याचा मी वाजंत्री; पाटणमधून उद्धव ठाकरे विरोधकांवर कडाडले | Marathi News

Udhav Thackarey Latest News : पाटणमध्ये हर्षद कदम यांच्या प्रचाराची सभा आज पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

Saam Tv

ज्याप्रकारे मी बाकी उमेदवारांना देतो आहे त्याचप्रमाणे मी या शिंदेला दिल होत खूप काही दिल होत. याला होम मिनिस्टर केला होता पण याने काय केल, पोलीस प्रशासनाचा वापर केला आणि मिध्यांना पळून जायला मदत केली, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. आज पाटणमध्ये हर्षद कदम यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. 'जो करेल मला मंत्री त्याचा मी वाजंत्री', अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, आपली सत्ता येउ द्या मग मी ही सगळी प्रकरण मार्गी लावतो. हे गुजरातच्या समोर झुकणारे ज्यावेळेस तुमच्या समोर येतील त्यावेळेस त्यांना विचारा माझ्या मुलाला अजून नोकरी का नाही आहे? आणि यावर ते काय उत्तर देतात ते पाहा. या लोकांनी अदानीचा घशात घातलेली मुंबई निकालानंतर मी माझ्या महाराष्ट्राला परत देईन असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं. तर मोदींनी उद्धव ठाकरेंना एक आव्हान दिलं होत ज्यात ते म्हणाले होते, शहजादे के मुहसे बाळासाहेब के लिये दो शब्द बुलवाओ या त्यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देत म्हणाले की, भाजपची नीती आहे तोडा फोडा राज्य करा. मोदींनी आपल सरकार पाडल कारण त्यांना महाराष्ट्र लुटायचा होता आणि तो मी लुटू देत नव्हतो म्हणून यांनी पहिला घाव हा शिवसेनेवर घातला जीला मराठी माणसाच्या आणि या महाराष्ट्राच्या न्यायासाठी हिंदुहृदयसम्रटांनी तयार केलं. शहजादा म्हणजे ते राहुल गांधींच्या मुखातून बाळासाहेबांसाठी दोन शब्द ऐकु इच्छितात. काल शिरळीमध्ये प्रियंका गाधी आल्या होत्या त्या म्हणाल्या मी राहुलची बहिण आहे आणि त्या बाळासाहेबांबद्दल चांगलं बोलल्या. म्हणजे भाजपचे दात घातले घशात, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राणेंनी कोकणात डाव टाकला! उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का; शेवटच्या तासात बाळ मानेंची माघार

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये राष्ट्रवादी बंडखोर साजिद बेग यांची निवडणुकीतून माघार

Famous Producer Death : तेजस्वी तारा हरपला! ज्येष्ठ निर्मात्याचे निधन, मुंबईतल्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

कराडकरांना Good News; मुंबई-कोल्हापूरचा प्रवास सुसाट होणार

Virat Kohli injury: टीम इंडियाला मोठा झटका; अफगाणिस्तान सिरीजपूर्वीच विराट कोहली बाहेर, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT