uddhav thackeray  Saam tv
Video

राज्यभरात सोमवारी जनआक्रोश आंदोलन, ठाकरे मैदानात उतरणार

Political protests in Maharashtra and Delhi on Monday : ठाकरेसेनेतर्फे सोमवारी राज्यभरात जनआक्रोश आंदोलन होणार आहे. मुंबईत उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उतरणार आहेत. फडणवीस सरकारविरोधात जिल्हा पातळीवर आंदोलन होणार आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Uddhav Thackeray Jan Aakrosh protest in Maharashtra : राज्यातील जनतेला जागरूक करण्यासाठी ठाकरेसेनेच्या वतीने सोमवारी राज्यभरात जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे... मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर होणाऱया आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत.. या आंदोलनात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ठाकरेसेनेने केलंय.

सोमवारी देशभरात दोन महत्त्वाची आंदोलनं होमार आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना जनआक्रोश आंदोलन करणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात हे आंदोलन असेल. विधिमंडळात अनेकदा आवाज उठवून सुद्धा देवेंद्र फडणवीस या सरकारचे दिल्लीतील मोदी आणि शहा हे ऐकायला तयार नाहीत. महाराष्ट्र लुटणाऱ्या दगाबाज सरकारला पाठीशी घालत आहेत, त्याच्यामुळे लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणे हा आमच्याकडे पर्याय आहे, असे राऊत म्हणाले.

दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे महत्त्वाचं आंदोलन आहे. उद्या सर्व खासदार, विरोधी पक्षाचे प्रमुख दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयावर लॉन्ग मार्च काढणार आहेत. निवडणूक आयोग ज्या पद्धतीने घोटाळे करत आहे, घोटाळे करणाऱ्यांना संरक्षण देत आहे, त्याविरोधात आंदोलन आहे, असे राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये पारंपारिक ढोल-ताशाच्या गजरात बारा मेळा गणपतीचे आज विसर्जन

Panic Attack : पॅनिक अटॅक कसा ओळखावा आणि प्रथोमपचार काय करावे ?

Maratha Reservation: छगन भुजबळांच्या नाराजीवर सुनील तटकरे म्हणाले.. VIDEO

OBC Reservation: भाजपचे ४, शिवसेना-राष्ट्रवादीचे २- २ सदस्य; ओबीसी समाजाची उपसमिती काय काम करणार?

Tapalwadi Waterfall : पावसात लांब कशाला? मुंबईतच वसलाय स्वर्गाहून सुंदर टपालवाडी धबधबा

SCROLL FOR NEXT