Bharat Gogawale saam tv
Video

Bharat Gogawale: राज ठाकरेंना जर त्यांचा पाझर फुटला असेल तर... मंत्री भरत गोगावले नेमकं काय म्हणाले? VIDEO

Uddhav and Raj Thackeray Reunion Possible? आज सकाळपासूनच राज्याच्या राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे, त्याच कारण म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच मनोमिलन.यावरच मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Omkar Sonawane

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात का? असा सवाल अभिनते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना विचारल्यावर राज ठाकरे यांनी त्याला सकारात्मक देत महाराष्ट्रासमोर आमचा वाद हा किरकोळ आहे असे सूचक विधान केले आणि उद्धव ठाकरे यांनी देखील त्याला दुजोरा दिला. यावरच मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, महाराष्ट्रासाठी कोणतेही प्रश्न शिल्लक राहिले आहे असं आम्हाला वाटतं नाही आणि राहिले असेल तर महायुती म्हणून आम्ही त्याला सामोरे जाऊ शकतो. जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत असतील तर ते त्यांच्या दृष्टीने चांगल आहे. तसेच एकनाथ शिंदे हे त्यांना भेटायला गेले होते. आम्ही त्यांना विचारणार आहोत, की भेटीत काय चर्चा झाली असे गोगावले म्हणाले.

आता राज ठाकरेंना जर त्यांचा पाझर फुटला असेल तर ते कधीही एकत्र येऊ शकता. तसेच आगामी महापालिका निवडणुकीवर यांचा काही परिणाम होईल का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मुंबईतील अनेक उबाठाचे नगरसेवक आमच्याकडे आले आहे आणि मुंबईसह कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिका निवडणूक आम्हीच जिंकू असा विश्वास मंत्री गोंगावले यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: आरसीबीनं जिंकली नाणेफेक, गुजरातला दिलं फलंदाजीचं आमंत्रण

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीतून अभिमन्यू खोतकर यांची माघार

लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांना पुन्हा १५०० रुपये मिळणार? सुप्रिया सुळेंची फडणवीस सराकारकडे मोठी मागणी

Fort In Nashik : आकाशाला भिडणाऱ्या पायऱ्यांचा थरार, नाशिकमधील 'या' किल्ल्याची भव्यता पाहून हृदयाचा ठोका चुकेल

Monday Horoscope: कामाच्या ठिकाणी कौतुक होणार, ५ राशींचे बढतीचे योग आहेत; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT