Uddhav Thackeray Pays Tribute to Ajit Pawar saam tv
Video

Ajit Pawar Death : कार्यकर्त्यांना जपणारा नेता....उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली

uddhav thackeray tribute to ajit pawar : अजित पवार यांचं आज, बुधवारी विमान अपघातात निधन झालं. उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Nandkumar Joshi

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज, बुधवारी विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. बारामती विमानतळावर लँडिंगवेळी विमान अपघात झाला. यात अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. महाराष्ट्रातील उमदा नेता, कुशल प्रशासक नेता हरपला, अशा शब्दांत राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी दुःख व्यक्त केलं आहे. बारामतीत हॉस्पिटलबाहेर जमलेले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते धायमोकलून रडत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

एक खंबीर नेता आणि माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी मी गमावला. मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक आणि अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत. महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना कुटुंबीयांकडून श्रद्धांजली, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेतही येणार लाडकी योजना? महिलांना मिळणार 273 जागांचे आरक्षण?

Maratha History: छत्रपती शिवरायांच्या या मावळ्याला खुद्द औरंगजेबही घाबरायचा, थेट मोगल छावणीवर टाकलेली धाड

Maharashtra Live News Update: मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात

Ranveer Singh: धुरंधर रणवीर सिंग 'त्या' प्रकरणामुळे पुरता अडकला, मंदिर अन् कोर्टाची पायरी चढावीच लागणार, नेमकं प्रकरण काय?

Angry Bull Attack: १,२ नव्हे ३ वेळा, रस्त्यावरच ट्रॅक्टरला जोरात बैलाने धडक दिली, ट्रक्टरचा चेंदामेंदा झाला, थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT