Aaditya Thackeray and Uddhav Thackeray saam tv
Video

ठाकरेंच्या शिवसेनेत हालचालींना वेग; आगामी काळात मोठ्या बदलाचे संकेत, VIDEO

Maharashtra Politics : मनसे, शिंदेंच्या शिवसेनेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेतही हालचाली वाढल्या असून, आगामी काळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. शाखाप्रमुखांसह नेत्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तसे संकेत देण्यात आले आहेत.

Nandkumar Joshi

वैदेही काणेकर, मुंबई | साम टीव्ही

महाराष्ट्रातील विधानसभा, महापालिका, पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. २०२९ मध्ये पुन्हा विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदेंची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे या प्रादेशिक पक्षांनी संघटनात्मक बदल करत, पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. महत्वाच्या नेत्यांवर जबाबदारी देताना काम करणार, तोच यापुढे पदावर राहणार असा इशाराही त्या-त्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संबंधितांना दिला आहे. आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेतही हालचालींना वेग आला आहे.

ठाकरेंची शिवसेना अॅक्शन मोडवर आली आहे. शिवसेना भवनात महत्त्वाची बैठक झाली. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबईतील सर्व शाखा प्रमुखांची बैठक घेतली आहे. आदित्य ठाकरे मुंबईतील प्रत्येक शाखांना भेटी देणार आहेत. पक्षबांधणीच्या अनुषंगाने ठाकरेसेना लवकरच स्थानिक पाठळीवर बदल करण्याच्या तयारीत आहे. पदावर असून कोणाच्या दबावामुळे जर काम करता येत नसेल तर, त्यांना पदापासून दूर करून नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असं आदित्य ठाकरेंनी सांगितल्याचे कळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT