Uddhav Thackeray On Amit Shah Saam Tv
Video

Uddhav Thackeray: 'दसरा मेळाव्यात शाहांचा फडशा पाडणार', उद्धव ठाकरे अमित शहांवर कडाडले

Girish Nikam

लोकसभा निवडणुकीत महायुतीची पिछेहाट झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी भाजप हायकमांड कमालीचं सतर्क झालंय. त्यामुळेच भाजपचे चाणक्य केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे सातत्यानं महाराष्ट्र दौरे होतायेत. राज्यात भाजपचे मेळावे घेऊन आणि महायुतीची बैठक घेऊन ते नेत्यांना, कार्यकर्त्यांना कानमंत्र देत आहेत. मविआ म्हणजे औरंगजेबच फॅन क्लब आहे. आणि उद्धव ठाकरे त्यांचे नेते आहेत, अशी टीका अमित शाहांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी अमित शाहांनी मुंबई दौऱ्यातूनही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता, यावरच आता अमित शाहांच्या विधानाचा दसरा मेळाव्यात फडशा पाडणार असा आक्रमक पवित्रा ठाकरेंनी घेतलाय. मशाल गीत लॉन्च करताना ठाकरेंनी थेट शाहांनाच लक्ष्य केलंय. तर अमित शाहांवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकणं असा पलटवार प्रवीण दरेकरांनी केलाय..

शिवसेनेचा शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा हा कार्यकर्त्यांना दिशा देणारा असतो. यंदा शिवाजीपार्कात ५८ वा दसरा मेळावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यामुळे आता शिंदे गटाचाही स्वतंत्र दसरा मेळावा होतो. सध्याच्या राजकीय संघर्षात आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर या मेळाव्यातून टीकेचे बाण सुटणार, निर्धाराची मशाल पेटणार यात शंकाच नाहीय. मात्र यात महाराष्ट्र विधानसभेवर विशेष लक्ष देणा-या अमित शाहांविरोधात ठाकरेंची तोफ धडाडणार याचे संकेत आताच ठाकरेंनी दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Vakri : 15 नोव्हेंबरपर्यंत शनी देव चालणार वक्री चाल; 'या' राशींच्या घरी येणार पैशांचा पाऊस

Accident News: शिंदे गटाच्या पालकमंत्र्यांच्या गाडीची टेम्पोला धडक, अपघातानंतर वाहन उलटले; चालक गंभीर जखमी

Maharashtra Rain: राज्यात पावसाची उसंत! तुरळक ठिकाणी सरी बरसणार; वाचा आजचा हवामान अंदाज

Horoscope Today : कुटुंबात सुख-शांती नांदेल, नकारात्मक विचारांपासून दूर राहावे; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागणार, प्रवास शक्यतो टाळावेत; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT