Shrinivas Vanga Saam Tv
Video

Shrinivas Vanga: 'उद्धव ठाकरे देव माणूस, माझी चूक झाली', उमेदवारी न मिळाल्याने शिंदेंचे आमदार ढसाढसा रडले; VIDEO

Maharashtra Assembly Election 2024: उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले आहेत.

Saam Tv

शिंदे गटाचे नेते श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी डावळण्यात आली असून यामुळे सध्या वनगा कुटुंबीय मोठ्या चिंतेत आहेत. पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या जागी भाजपमधून आयात करून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे श्रीनिवास वनगा मागील दोन दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असून अन्नपाणी सोडून दिलं आहे. पालघर नाही तर डहाणू विधानसभेचे तरी तिकीट मिळेल, या आशेवर राहिलेल्या वनगा यांना मात्र शिंदे यांनी पूर्णतः वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला.

वाढदिवसाचे कारण देऊन बंड करणारे एकनाथ शिंदेसह चाळीस आमदारांना घेऊन गुजरातला गेले. तेच श्रीनिवास वनगा यांच्या मुलाचा वाढदिवस आहे, असं सांगून बंड करण्यात आला. मात्र यात पूर्णतः तिकीट कापून आपल्याला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप श्रीनिवास वनगा यांनी केला आहे. मला आमदार करणारे उद्धव ठाकरे होते, त्यांच्या कृपेमुळेच मी आमदार झालो आणि त्या देव माणसाची मला माफी मागायची आहे. मी त्यांच्याकडून कुठल्याही पदाची अपेक्षा करत नाही. पण मी माझ्या केलेली चुकीची माफी देव (उद्धव ठाकरे) माणसाकडे जाऊन मागणार आहे, असं ते म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे बदली?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?

Saturday Horoscope: जोडीदारासोबत दिवस उत्तम, 5 राशींच्या व्यक्तींना पैशांची चणचण; वाचा शनिवारचे राशीभविष्य

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्र अव्वल; गणेशोत्सव चित्ररथाने मिळवला सर्वोच्च बहुमान

शरद पवार आणि अजितदादांची राष्ट्रवादी एक होणार? शोक सभेदरम्यान बड्या नेत्याने तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT