uddhav thackeray news  Saam tv
Video

उद्धव ठाकरे पक्ष फुटीनंतर पुन्हा मैदानात; शिवसैनिकांना घातली भावनिक साद, काय म्हणाले?

uddhav thackeray News : उद्धव ठाकरे पक्ष फुटीनंतर पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घालत आशादायी संदेश दिला आहे.

Vishal Gangurde

उद्धव ठाकरे पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. चार वर्षांनंतर ठाकरे गटात पुन्हा फूट पडली आहे. ६ खासदारांनी साथ सोडून दिल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी ४ वर्षांपूर्वी ठाकरेंचे ४० आमदार फोडले होते. त्यानंतर ६ खासदारांनी ठाकरेंवर आरोप करत साथ सोडली. सर्व बंडखोर ६ खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे पक्ष ६० वा वर्धापन दिन साजरा करत असताना मशाल चिन्हावर निवडून आलेले खासदार शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. राज्यातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भावनिक पोस्ट शेअर करत शिवसैनिकांना साद घातली आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा बोलका फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यासोबत कवी कुसुमाग्रज यांच्या ओळी लिहिल्या आहेत. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. 'किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी, या आशयाची पोस्ट पुन्हा मैदानात लढण्यासाठी सज्ज असल्याचा आशादायी संदेश ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: पगार अन् पेन्शनवाढीसाठी पुढचा आठवडा महत्त्वाचा! कर्मचाऱ्यांनी 'या' तारखेकडे ठेवा लक्ष

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत निकटवर्गीय सचिन सानप पुणे शिक्षक मतदार संघातून उभे राहणार यावर ठाम.

खासगी क्लासच्या सहलींसाठी कडक नियमावली करा; मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?

15 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

CJP Shivaji Park Protest: अभिजीत दीपकेंसह 500 जणांविरोधात FIR; शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT