Udhhav Thackeray Saamtv
Video

Udhhav Thackeray : चार भिंती आणि एक पुतळा म्हणजे स्मारक नाही; उद्धव ठाकरेंची भावुक प्रतिक्रिया | VIDEO

Udhhav Thackeray Press Conference : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामकाजाची पाहणी आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Saam Tv

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात आपलं स्वागत करताना आनंद होतोय. या वास्तूसह आम्ही एक भावनात्मक बंधनासह जोडले गेलो आहे. केवळ ४ भिंती आणि १ पुतळा म्हणजे स्मारक नाही अशी भावनिक प्रतिक्रिया आज उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं कामकाज कुठपर्यंत झालं हे पाहण्यासाठी आज शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्मारकस्थळी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट यांना धन्यवाद देऊ इच्छितो. हे काम आता फार सोपं वाटतंय. पण करताना फार कठीण होतं. या स्मारकावर काम सुरु आहे आणि चर्चादेखील सुरु आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्मारकही बाजूलाच आहे. पण या जागेतलं आव्हान म्हणजे, एक महापौर बंगला. या बंगल्याला आम्ही केवळ वास्तू म्हणून बघत नाहीत तर त्या वास्तू बरोबर आम्ही एक भावनात्मक बंधनासह जोडले गेलो आहोत, अशी भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. तसंच ही वास्तू हेरीटेज वास्तू आहे. या वास्तूला कुठेही धक्का न लावता काम करणं खूप कठीण होतं. त्या वास्तूचं वैभव जपून काम करणं हे फार कठीण होतं. ही कल्पना आर्किटेक्ट आभा लांबा यांची आहे. त्यामुळे मी आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट्स यांचा आभारी आहे. त्यांनी अत्यंत देखणं काम वेळेमध्ये टप्पा 1 पूर्ण केलेला आहे. टप्पा 2 च्या कामाला आता सुरुवात होईल. या कामातून संपूर्ण शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट बघायला मिळणार आहे. त्यावेळी जे पंतप्रधान असतील ते उद्घाटनाला येतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT