Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis saam tv
Video

Uddhav Thackeray : ते फडणवीस असले तरी आपण २० आहोत, पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा वज्रमूठ आवळली!

Uddhav Thackeray Statement : देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधतानाच उद्धव ठाकरेंनी आपल्या नवनिर्वाचित आमदारांना कानमंंत्र दिला. मुंबईत मातोश्रीवर आमदारांसोबत बैठक झाली.

Nandkumar Joshi

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. तर महायुतीनं जोरदार मुसंडी मारताना २३० आमदार निवडून आले. ५ अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळं राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल. पण दुसरीकडं सरकार आणण्याचा निर्धार केलेल्या महाविकास आघाडीचा आणि मित्रपक्ष ठाकरे गटाचा निवडणूक निकालानं भ्रमनिरास झाला. ठाकरे गटाचे फक्त २० आमदार निवडून आले आहेत. मात्र, पराभवानं खचून न जाता उद्धव ठाकरे यांनी विजयी उमेदवार आणि राज्यभरातील शिवसैनिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांना कानमंत्र दिला.

ते फडणवीस असले तरी आपण २० आहोत. आपण पुरून उरू, असं उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित आमदारांना म्हणाले. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ठाकरे गटाचे २० आमदार मुंबईत मातोश्रीवर बैठकीला गेले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधताना कानमंत्र दिला. तसंच यावेळी त्यांना मार्गदर्शनही केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT