Marathi Vijayi Melava Saam TV
Video

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

Marathi Vijayi Melava : त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यानंतर, आज ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ढोल वाजवत कार्यकर्त्यांचा जल्लोष दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यानंतर, आज ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य एकत्रित मेळावा मुंबईतील वरळी येथील डोममध्ये पार पडणार असून, राज्याच्या राजकीय वर्तुळात याकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.विशेष म्हणजे, या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल दोन दशकांनंतर एकाच व्यासपीठावर येणार आहेत. सकाळी 11.30 वाजता दोन्ही नेते डोममध्ये दाखल होणार आहेत.

कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणताही पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह घेऊन न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शांततेत आणि संयमानं हा मेळावा पार पाडण्याचे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.त्रिभाषा धोरणाच्या विरोधात एकत्र लढा देणाऱ्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार, मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली

Ganeshotsav 2026 : गणरायाच्या आगमनाने महाराष्ट्र भक्तिमय, मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

Maharashtra News Live Update: सांगलीमध्ये भीषण अपघात, कार वारणा नदीत कोसळली

konkan Fort : घोड्याच्या नालासारखा आकार असलेला किल्ला, रचना पाहून व्हाल थक्क!

Ladki Bahin Yojana: ४ दिवसांत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० जमा होणार, ऑगस्टच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

SCROLL FOR NEXT