Uday Samant's Cryptic Status 
Video

Maharashtra politics : ठाकरे-फडणवीसांची जवळीक, सामंतांनी थेट निशाणा साधला, स्टेट्‍सची राजकीय वर्तुळात चर्चा

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र विमान प्रवासानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे नेते उदय सामंत यांनी ठेवलेल्या सूचक स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

Uday Samant's Cryptic Status : शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईहून नागपूरला जाताना एकाच विमानाने एकत्र प्रवास केला. या प्रवासादरम्यान विमानामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, विनायक राऊत हे नेतेही उपस्थित होते. या प्रवासानंतर शिंदेसेनेचे नेते उदय सामंत यांनी ठेवलेले स्टेट्‍सची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची कधीच वेळ येत नाही. असा मजकूर आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा हातात हात असलेला फोटो सामंत यांनी स्टेट्‍सला ठेवला आहे. त्याशिवाय धनुष्यबाण आणि कमळ चिन्ह असलेला फोटो स्टेट्‍सला ठेवण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कालच्या एकत्रित विमान प्रवासावर सामंत यांच्या स्टेट्सला महत्व आलेय.

ठाकरे-फडणवीस या दोन्ही नेत्यांच्या एकत्र विमान प्रवासामुळे आणि त्यांच्यात झालेल्या संवादाच्या फोटोंमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या भेटीवर सूचक भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले की, "विमानामध्ये आमची उच्च दर्जाची आणि उच्चस्तरीय चर्चा झाली असून, काय ठरले ते येत्या काही दिवसांत कळेल." तसेच हा दौरा त्यांच्या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातील (विशेषतः यवतमाळ) दौऱ्याची सुरुवात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Session Bill: मोठी बातमी ! वंदे मातरम्’चा अपमान केल्यास होणार तुरुंगवास; सरकार आणणार कठोर कायदा

Maharashtra News Live Update: देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं, महाराष्ट्राची धुरा एकनाथ शिंदेंकडे द्यावी - संजय गायकवाड

Silver Chain Design: दिसायला क्लासी आणि किंमतही बजेटमध्ये, चांदीच्या चैनच्या 'या' 7 आकर्षक डिझाईन्स एकदा नक्की पाहा

Maharashtra Politics: शरद पवारांची पुढची चाल काय? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींची मोफत साडी योजना बंद, वस्त्रोद्योग विभागाकडून शासन निर्णय जारी

SCROLL FOR NEXT