Taj Hotel Security SaamTv
Video

Taj Hotel : ताज हॉटेलची सुरक्षा भेदली; एकच नंबर प्लेट असलेल्या दोन गाड्या सापडल्याने उडाली खळबळ | Marathi News

Taj Hotel Mumbai Incident : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यापासून मुंबईचा अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताज हॉटेलबाहेर पोलिसांचा कायम तगडा बंदोबस्त असतो. मात्र आज ही सुरक्षा भेदली गेली आहे.

Saam Tv

मुंबईच्या जगप्रसिद्ध ताज हॉटेलच्या परिसरात आज एकाच नंबरप्लेटच्या दोन कार आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. हॉटेलमध्ये चेक इन केलं जात असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला. या दोन्ही कार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. या प्रकरणाचा तपास कुलाबा पोलिसांकडून करण्यात येत आहे. MH 01 EE 2388 अशा नंबर प्लेट दोन्ही गाड्यांवर दिसल्या. कारच्या चालकांची चौकशी सुरु आहे. ताज हॉटेल आणि परिसर मुंबईतील अतिसंवेदनशील भाग समजला जातो. त्या ठिकाणी असा प्रकार घडल्यानं पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी ताज हॉटेल लक्ष्य करण्यात आलेलं होतं. त्यानंतर हा भाग मुंबईतील अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. आज हॉटेलमध्ये चेक इन केलं जात असताना MH 01 EE 2388 अशा नंबर प्लेट असलेल्या पांढऱ्या रंगाच्या दोन कार आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यंत्रणा अलर्ट झाल्या असून या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT