Tuljapur Mandir Drugs Case saam tv
Video

Tuljapur Drugs Case : ड्रग्ज तस्कर पुजारी, तुळजाभवानी मंदिरात कायमस्वरुपी प्रवेशबंदी

Tuljapur Temple Priests in Drugs Case : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पुजाऱ्यांना आता तुळजाभवानी मंदिरात कायमस्वरुपी प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थाननं हा निर्णय घेतलाय.

Nandkumar Joshi

बालाजी सुरवसे, तुळजापूर

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थाननं हा निर्णय घेतला आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या आरोपी पुजाऱ्यांना कायमस्वरूपी तुळजाभवानी मंदिरात प्रवेशबंदीची कारवाई करण्यात येणार आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थान अॅक्शन मोडवर आले आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणाच्या चौकशीत ११ पुजाऱ्यांची नावे समोर आल्याची प्राथमिक माहिती आहे. मंदिर संस्थान या पुजाऱ्यांवर प्रवेशबंदीची कारवाई करणार आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात आतापर्यंत ३५ आरोपी असल्याचे स्पष्ट झाले असून, ८० जणांना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तुळजाभवानी मंदिर संस्थान ड्रग्स तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या आरोपी पुजाऱ्यांची नावे लेखी पत्र देऊन मागवून घेणार आहे. जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या आदेशानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

SCROLL FOR NEXT