Cabinet Minister Saam Tv
Video

Sunil Tatkare: आई तुळजाभवानी तटकरे साहेबांची कॅबिनेट मंत्री पदावर वर्णी लागू दे... पूजाऱ्याने घातले देवीला साकडे|VIDEO

Tuljabhavani Temple: देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना सुनील तटकरे यांनी आपल्या घरी जेवणासाठी बोलवल्यानंतर तटकरे यांची केंद्रात मंत्रीपदी वर्णी लागण्याची चर्चा जोर धरू लागली होती.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सहकुटुंब तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले आहे. यावेळी तटकरे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागू दे, असा पुजाऱ्यांनी देवीकडे साकडं घातलं आहे. याप्रसंगी तटकरे म्हणाले, आम्ही दरवर्षी आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी येथे येत असतो. महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुख समृद्धीचं आयुष्य लाभो आणि बळीराजाला सर्वात चांगले दिवस येवो, हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना केली, असे तटकरे म्हणाले. मात्र, काही दिवसापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगड दौऱ्यावर असताना सुनील तटकरे यांनी अमित शाह यांना आपल्या घरी जेवणासाठी बोलावले होते. त्यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आले. असे असतानाच पुजाऱ्यांनी हे साकडं घातलं आहे. आता पुजाऱ्यांचे साकडं हे देवी पूर्ण करते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Ajit Pawar : नंदुरबारला पावरफुल पालकमंत्री मिळणार? अजित पवारांच्या नावाची जोरदार चर्चा

Custard Apple : सिताफळ खाण्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

Hingoli Winter Tourism: गर्दीपासून लांब, निवांत ट्रिप! हिंगोलीजवळील या Hidden ठिकाणी घ्या गुलाबी थंडीची मज्जा

Mumbai : मुंबईतील धक्कादायक प्रकार! एकाच नंबरच्या दोन स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची ने-आण; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT