Sant Tukaram Palkhi Sohala 2025 Saam TV
Video

Ashadhi Wari: संत तुकाराम महाराजांच्या भजनात वारकरी दंग|VIDEO

Sant Tukaram Palkhi Sohala 2025: यंदाचा हा ३४०वा पालखी सोहळा असून,५०० हून अधिक दिंड्या देहूत दाखल झाल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आषाढी वारीच्या पाश्वभूमीवर संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज देहूपूरती परंपरेनुसार पूजाआर्चा झाल्यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. आज सकाळी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर त्या दर्शनासाठी मंदिरात ठेवण्यात आल्या. यावेळी संत तुकाराम महाराजांचे वंशज रामभाऊ मोरे यांनी पादुकांचं दर्शन घेतलं आणि विठ्ठलाच्या मूर्तीवरून हात फिरवताना त्यांचे डोळे पाणावले.

दरम्यान, दुपारी २.३० वाजता देहू येथील मुख्य देऊळवाड्यातून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. यंदाचा हा ३४०वा पालखी सोहळा असून,संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या वारकऱ्यांच्या ५०० हून अधिक दिंड्या देहूत दाखल झाल्या आहेत. अभंग, भजन, कीर्तनांच्या गजरात भक्तिरसात न्हालेलं वातावरण आहे. पोलिस प्रशासनानेही योग्य बंदोबस्त तैनात केला असून, भाविकांना कोणतीही अडचण न येता वारीचा आनंद घेता येईल, यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT