Truck engulfed in flames on Samruddhi Highway near Shapoor, authorities rush to control the blaze. Saam Tv
Video

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर ट्रकला लागली भीषण आग! पाहा थरारक VIDEO

Truck Catches Fire On Mumbai-Nagpur Samruddhi Highway: शहापूरजवळ मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर एका ट्रकला अचानक आग लागली. पर्यायी मार्ग नसल्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

Omkar Sonawane

शहापूर येथे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर आज दुपारी एका ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. चॅनल नंबर 650 जवळ घडलेल्या या अपघातामुळे महामार्गावर मोठी अडचण निर्माण झाली आहे. आग लागलेल्या ट्रक पर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्यामुळे अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. आग विझवण्यासाठी वेळेवर पाणी पोहोचू शकले नाही आणि त्यामुळे संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. यावेळी, पर्यायी मार्गापासून आग लागलेल्या ठिकाणापर्यंत 15 ते 20 किलोमीटर अंतर असल्याने अग्निशमन दलासाठी परिस्थिती अधिक कठीण बनली होती. सुदैवाने, घटनास्थळी कोणीही जखमी झाल्याची माहिती मिळाली नाही, परंतु ट्रक आणि आतमधील असलेले सर्व सामान जळून नष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माजी खासदार नवनीत राणा यांचं पुन्हा बाबरीची वीट रचणाऱ्यांना ट्विट करून दिले आव्हान

Diabetes Fruits Care: डायबेटीजच्या रुग्णांनी कोणती फळं खावीत? तज्ञांनी सांगितली यादी, एकदा वाचाच

Makeup Tips: मेकअप केल्यावर चेहरा काळा पडतो? मग या सोप्या स्टेप्स करा फॉलो पार्टीमध्ये तुम्ही दिसाल ग्लॅमरस

Director Arrested: ३० कोटींच्या फसवणुक प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक आणि पत्नीला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

Goa Nightclub Fire: गोव्याच्या नाईट क्लबमध्ये 'अग्नीतांडव' नाईट क्लबला आग कशी लागली?

SCROLL FOR NEXT